• वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव - वर्ष १८७७
 • वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव - वर्ष २०१६
 • वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव - १३१ वा वर्धापन दिन
 • वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव - अभ्यासिकेचे उद्घाटन

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय - जळगावचा सांकृतिक मानबिंदू

व. वा. जिल्हा वाचनालय ही महाराष्ट्रातील एक जुनी नामवंत संस्था आहे . जळगाव शहर व जिल्हातील वाचक व रसिकांची वाचनाची गरज वाचनालय गेल्या १३९ वर्षापासुन सतत भागवीत आहे. वैयक्तिक जीवनात नव्हे तर वाचनाचे एकुण आपल्याला दैनंदिनी व व्यावहारिक जीवनातही लाभ होता . एक प्रकारे गतिमान व्यक्तिमत्व साकारते अशा असामान्य कार्यामुळेच आपल्या वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा मानाचा व प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.


आपल्या व. वा. जिल्हा वाचनालयात दैनंदिन वृत्तपत्र वाचनाची सुविधा आहे. विविध क्षेत्रातील व विषयावरील अनेक मासिके व नियतकालिके येथे आपल्याला मिळतात. वाचनालयातील ग्रंथाची संख्या एक लाख तीस हजाराच्या वरती आहे. ही केवळ मराठी भाषेतील पुस्तके नाहीत तर इंग्रजी, हिंदी, गुजराथी, वाचकांची गरज ध्यानी घेवुन या भाषांतील पुस्तकांची संख्याही वाचनालयाकडे भरपूर आहे.


नवीन माहिती

 • O

  व.वा.वाचनालयाच्या १४० साव्या वर्धापन दिनानिमित्त व.वा.वाचनालय, जळगाव व कै. रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट,जळगाव यांच्या रस्ट,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्ल्यॅक अँण्ङ व्हाईट जमान्यातील गाजलेली अजरामर हिंदी गाणी - १९४५ ते १९६८ - (प्रवेश विनामूल्य)

  कार्यक्रम - शनिवार, दि. १ जुलै २०१७ - संध्याकाळी ६.३० व.
  स्थळ - ला.ना.शाळेचे कै. भैय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 • O

  व.वा.वाचनालयाच्या १४० साव्या वर्धापन दिनानिमित्त व.वा.वाचनालय, जळगाव व कै. रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट,जळगाव यांच्या रस्ट,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्ल्यॅक अँण्ङ व्हाईट जमान्यातील गाजलेली अजरामर हिंदी गाणी - १९४५ ते १९६८ - (प्रवेश विनामूल्य)

  कार्यक्रम - शनिवार, दि. १ जुलै २०१७ - संध्याकाळी ६.३० व.
  स्थळ - ला.ना.शाळेचे कै. भैय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अभिप्राय

कविवर्य श्री. मंगेश पाडगावकर

वाचनालय म्हणजे पुस्तकांची कपाटे कोंडण्याची खोली नव्हे:वाचनालय ज्ञानाच्या आणि मनाच्या विकासाचे खरे खुरे केंद्र आहे. व वा जिल्हा वाचनालय हे असेच सांस्कृतिक चैतन्याचे केंद्र आहे. अधिक माहिती..

सौ. गिरीजा कीर - ३० जानेवारी १९९४

११५ वर्षाच्या या प्रोढ वाचनालयाला भेट देतांना आनंद वाटला. समृद्ध संदर्भ विभाग, विश्वासू, मेहनती कर्मचारी व पुस्तकात रस घेणारा अधिकारी वर्ग वाचनालयाला लाभला आहे अधिक माहिती..

विंदा. करंदीकर

या वाचनालयातर्फे केशवसुतांचा पन्नासावा स्मृतिदिन उत्साहाने व औचित्येने साजरा झाला. स्मृतीदिनामध्ये माझ्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असल्याने संदर्भात व केशवसुतांच्या अधिक माहिती..

एस.एम.जोशी

आज वल्लभदास वालजी वाचनालयाला भेट देण्याचा सुयोग आला. लोकशाहीच्या वाढीच्या दृष्टीने वर्त्मान्पात्राप्रमाणे वाचानालायाना फार मोठी कामगिरी बजवावयाची आहे. अधिक माहिती..

गोपल नीलकंठ दांडेकर - ४ डिसेंबर १९६०

साक्षरता वाढीस लागली आहे, आणि गुणसमृद्ध वाचनालयांची गरजही वल्लभदास वालजी वाचानालायासारख्या संपन्न वाच्नालायांमुळे ही गरज अंशतः तरी भागो.अधिक माहिती..

श्री.म.माटे

आज ही पुरातन संस्था पहिली! उत्साही कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हिचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत आहे: असाच होत राहो. अधिक माहिती..

शंकरराव खरात - ११ डिसेंबर १९८४

व.वा. जिल्हा वाचनालयाला आज भेट दिली. वाचनालय जुने - शतकापूर्वीचे असून वाचनालयाच्या जीवनात या वाचनालयाने एक प्रकारची क्रांतीच केली आहे. अधिक माहिती..

वसंत कानेटकर - ७ जुलै १९९६

आज रोजी वाचनालयाला भेट देऊन संस्थेचे कामकाज जवळून पाहण्याचा योग आला आणि आनंद वाटला. संस्थेचे सगळेच पदाधिकारी कल्पक, रसिक आणि कष्टाळू आहेत. अधिक माहिती..

विजय तेंडूलकर

नव्या माध्यमांमुळे वाचनाचीरुची नष्ट होईल असे मला वाटत नाही. वाचनाची रुची साहित्याच्या दर्जावर ठरते. मराठीत जोवर वाचाण्याजोगो साहित्य लिहिले जाईल तोवर वाचन राहील आणि. अधिक माहिती..

बाबासाहेब पुरंदरे - २० डिसेंबर १९९१

ग्रंथालय म्हणजे सरस्वतीचे मंदिर, ११५ वर्षापूर्वी स्थापन झालेले हे मंदिर म्हणजे खानदेशाचे भूषण आहे. अनेक जुने ग्रंथ येथे आहेत. हे मोलाचे धन अभ्यासकांना अमृतासारखे मौल्यवान आहे. अधिक माहिती..

मधुकरराव धनाजी चौधरी - १० फेब्रुवारी १९९२

व.वा.वाचनालय म्हणजे जळगाव शहराचे व जिल्ह्याचे एक सांस्कृतिक केंद्र. व्यक्ती व समाजाचे मन आणि जीवन विचार-आचार-संस्कारांनी समृद्ध बनविण्याचे विविध उपक्रम येथे चालू असतात अधिक माहिती..

प्रल्हाद केशव अत्रे

जळगाव येथे आज रोजी आलो असता घाईघाईने वल्लभदास वालजी वाचनालयाला भेट दिली. जळगावच्या नागरिक जीवनातील हे एक महत्वाचे केंद्र आहे. अधिक माहिती..

ग.दि.माडगुळकर - ३ जुलै १९६५

सानेगुरुजी स्मारकाविषयी चर्चा करण्याच्या निमित्ताने इथे आलो असताना, वाचनालयास भेट देण्याचा योग आला. वाचनालयाचे काम पाहून खूप समाधान वाटले. अधिक माहिती..

जयंत नारळीकर

व.वा.वाचनालय म्हणजे जळगाव शहराचे व जिल्ह्याचे एक सांस्कृतिक केंद्र. व्यक्ती व समाजाचे मन आणि जीवन विचार-आचार-संस्कारांनी समृद्ध बनविण्याचे विविध उपक्रम येथे चालू असतातअधिक माहिती..

© Copyright 2018 वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव

Design by Siddhi Software Solutions